आपण पाहतो की, वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवड असणारे लोक नव्या खाद्यपदार्थांच्या शोधातच असतात. तसेच
सध्या सोशल मीडियावर (Social media) खाद्य पदार्थांचे अनेक वेगवेगळे आणि भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान अलीकडे बाहुबली पानीपुरी, बाहुबली थाळी सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत असते. दरम्यान अशातच आता मेरठमधील (Merath) समोस्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पण ऐका, हा समोसा (Bahubali Samosa) साधासुधा नसून तब्बल आठ किलोचा (8 Kg) आहे.
बिग ब्रेकिंग! ‘या’ तणनाशकावर बंदी; शेतकरी झाले नाराज.. नेमकं काय आहे कारण?
जर हा समोसा जो कोणी संपूर्ण खावून दाखवेल त्याला बक्षिसही तितकंच मोठं आहे. हा समोसा संपवणाऱ्याला चक्क 51 हजार बक्षीस (51 thausand rupies gift) मिळणार आहेत. आठ किलोच्या या समोस्याचा व्हिडीओ बिजनेसमॅन हर्ष गोयंकाने त्यांच्या पर्सनल ट्वीटरवर शेअर केलाय. हा समोसा उत्तर प्रदेशमच्या मेरठमधील एका मिठाईच्या दुकानात बनवला गेला आहे.
After all the Diwali sweets, my wife has ordered me to eat not more than one samosa today…… pic.twitter.com/WjuRObFD0T
— Harsh Goenka (@hvgoenka) October 26, 2022
मोठी बातमी! राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलली, कारण…
या दुकानात तुम्हाला बाहुबली समोसा मिळेल तोही तब्बल आठ किलोचा. यात आलू आणि पनीरची स्टफिंग तुम्हाला भरभरून असल्याचे दिसेल. दरम्यान या समोस्याची किंमत अकराशे रुपये आहे. या आठ किलोच्या समोस्याचा व्हिडीओ फूड ब्लॉगर आनंद चाहतनेही सोशल मीडियावर शेअर केलाय. या बाहुबली समोस्याच्या व्हिडीओने सोशल मीडियावर तुफान राडा घातलाय. इतकंच नाही तर सगळीकडे या समोस्याची जोरदार चर्चा सुरू आहे.