
Ajit Pawar । मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना अर्थखाते देण्यात आले. अर्थखात्याची जबाबदारी हाती आल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि शिंदे गटाच्या आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. परंतु निधीवाटपावरून त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. (Latest Marathi News)
Adani Group । ब्रेकिंग न्यूज! गौतम अदानींनी विकली 1,600 कोटींची कंपनी
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी 25 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये विकासकामांसाठी 1500 कोटींची तरतूद केली असून त्यांनी राष्ट्रवादीसोबत शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मंजूर केला आहे.
JioBook laptop । आनंदाची बातमी! जिओ लाँच करणार स्वस्त लॅपटॉप, मिळतील जबरदस्त फीचर्स
निधी वाटपाच्या आरोपावरून अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बोलताना ते म्हणाले की, “निधी वाटप करत असताना कोणावरही अन्याय झाला नाही. सर्व आमदारांना समान निधी देण्यात आला आहे. परंतु विरोधक आरोप करत आहेत, त्यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही”, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.