Asha Parekh: अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, हिंदु महासंघाच्या आनंद दवेंनी उपस्थित केला ‘हा’ प्रश्न

Dadasaheb Phalke Award announced to actress Asha Parekh, Hindu Federation's Anand Dave raised this question

मुंबई : दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या आयुष्यभराच्या योगदानासाठी भारत सरकारकडून दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी म्हणजे 2022चा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांना देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी केली आहे. परंतु हिंदु महासंघाच्या आनंद दवे यांनी या पुरस्काराबाबत अस वक्तव्य केलं आहे ज्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आनंद दवे यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार हा काम पाहून की आडनाव पाहून दिला आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Munmun Dutta: “माझे लग्न झालेलं मित्र माझ्याबरोबर…”, तारक मेहता फेम मुनमुन दत्ताचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा

आनंद दवे म्हणाले की, फाळके पुरस्कार काम पाहून का आडनाव पाहून? पारेखांपेक्षा आपले सचिन उजवे ठरतात. चित्रपटात कामं करणं आणि चित्रपटसृष्टीसाठी योगदान यात काही फरक नाही का? असा सवाल दवे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, आशा पारेख या वयाच्या दहाव्या वर्षापासून ते आजपर्यंत सतत ७० वर्ष सक्रिय राहणं सुद्धा उत्तमच आहे. पारेख
यांच्या भूमिका, त्यांची कला, विविधता, नृत्य चांगले आहेतच. परंतु हे सगळ व्यक्तिगत झालं,मग यामध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी काय केल हा प्रश्न उभा राहतोय.

Amol Mitkari: “…तर शिंदे सरकार दसऱ्यापूर्वीच कोसळणार” , राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींचे भाकीत चर्चेत

पुरस्कारावरून बोलताना पुढे दवे यांनी ” आगामी गुजरातच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गुजरात्यांच वर्चस्व त्यांच्या समाधानासाठीच हा निर्णय घेतला असावा, एवढच नाही तर आशा पारेख यांचे आत्ता सर्वत्र सन्मान, सत्कार होतील त्याला स्थानिक भाजपनेते उपस्थित राहून अपेक्षित निकाल येतील अशी टीकाही आनंद दवे यांनी केली आहे.

Sanjay Raut: ‘या’ तारखेला राऊतांच्या जामिन अर्जावर होणार सुनावणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *