मुंबई : ‘टाईमपास’ हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामधील कलाकार लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. यामध्येच या चित्रपटातील ‘दगडू’ हा सर्वांचा आवडता कलाकार. सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दगडूला त्याच्या खऱ्या आयुष्यातील प्राजु मिळाली असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
‘या’ योजेनंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार ८० लाख रुपये अनुदान
टाईमपास चित्रपटातील दगडूची भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) याने दिवाळीनिमित्त फोटोशूट केलं असून काही फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरसोबत फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.
शेळी पालनाचा विचार करताय?, आता १० शेळ्या पाळण्यासाठी मिळणार ४ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
या फोटोवरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले कि, ‘दादूस आमची वहिनी काय?’ पण यावर प्रथमेशने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून खुलासा देखील केला नाही.
‘या’ योजनेंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळणार 27 लाख रुपये; वाचा सविस्तर