VIDEO । तरुणीसह डान्स करणं होमगार्डच्या आलं अंगलट, घडलं असं काही की..

VIDEO

VIDEO । सध्या सोशल मीडियाचा (Social media) वापर खूप वाढला आहे. कित्येक तास तरुणाई सोशल मीडियाच्या नादात गुरफटलेली दिसते. यामुळे त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. इंस्टाग्राम रील्सवर (Instagram Reels) प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणवर्ग कोणत्याही थराला जातात. अनेकदा त्यांना हुल्लडबाजी अंगलट येते. ट्रेन, बस, धबधब्यांच्या ठिकाणी रिल्स केले जातात. यातून चुकीचे प्रकार देखील होतात. (Latest Marathi News)

Maharashtra Employees Strike । मोठी बातमी! आजपासून राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर, नेमकं कारण काय?

एका होमगार्डला तरुणीसह ट्रेनमध्ये डान्स (Dance in Train) करणं चांगलंच महागात पडले आहे. तरुणी आणि होमगार्डचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. होमगार्डवर (Home Guard viral video) जीआरपीने (GRP) कारवाई केली आहे. सायबा या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने हा व्हिडीओ शूट केला असून व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये तरुणी वर्दीत असणाऱ्या होमगार्डसह नाचताना दिसत आहे.

एस एफ गुप्ता असे या होमगार्डचे नाव आहे. होमगार्डने तरुणीसह वर्दीमध्ये अश्लील डान्स केल्याने नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर तातडीने विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या अधिकृत हँडलमध्ये होमगार्डवर कारवाई करण्यासाठी आरपीएफला टॅग केले होतं. शिवाय जीआरपीने कर्मचाऱ्यांना गणवेशात आणि कर्तव्यावर असताना अशा गोष्टींमध्ये पडू नका, असा सल्ला दिला आहे.

OBC । ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून नवीन योजनेची घोषणा

Spread the love