Dangal Fame Suhani Bhatnagar । आमिर खानच्या दंगल या चित्रपटातील बालकलाकार सुहानी भटनागरच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुहानाचे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी निधन झाले. दंगलची संपूर्ण स्टारकास्ट या बातमीने हैराण झाली आहे. काल बातमी आली की सुहानीच्या शरीरात औषधांची रिॲक्शन झाली आहे. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. आता सुहानीच्या वडिलांनी पीटीआय एजन्सीला त्यांच्या मुलीच्या आजाराबद्दल सांगितले आहे.
सुहानीच्या वडिलांनी सांगितले की सुहानी डर्माटोमायोसिटिस या दुर्मिळ दाहक आजाराने ग्रस्त होती ज्यामुळे त्वचेवर लाल डाग पडतात आणि स्नायू कमकुवत होतात. ७ फेब्रुवारीला सुहानीला दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. वैद्यकीय गुंतागुंतीमुळे 16 फेब्रुवारी रोजी तिचे निधन झाले.
Mike Procter Death । क्रिकेट विश्वावर मोठी शोककळा! दिग्गज ऑलराउंडरचं निधन
सुहानीचे वडील सुमित भटनागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहानीच्या हातावर सुमारे दोन महिन्यांपासून लाल डाग होते. त्यांना ही ऍलर्जी आहे असे वाटले आणि त्यांनी फरिदाबादमधील अनेक हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सल्ला घेतला. दरम्यान, सुहानाच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर दंगलच्या स्टार कास्टने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
Baramti News । बारामती मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष! सुप्रिया सुळे देणार सुनेत्रा पवार यांना टक्कर?