Pune News । पुणे : भारतावर सतत दहशतवादी हल्ले (Terrorist attacks) करत असतात. या हल्ल्यात अनेक पोलीस शहिद होतात तर काही दहशतवादी ठार देखील होतात. मागील वर्षी पुण्यात तीन दहशतवाद्यांना पुणे, मुंबई शहरात घातपात करण्याच्या तयारीत असताना कोथरुड पोलिसांकडून पकडण्यात आलं होतं. त्यांच्याबाबत आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Latest marathi news)
आयसिस या संघटनेच्या दहशतवाद्यांनी कोंढव्यात बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण (Bomb making training) घेतलं होतं. इतकेच नाही तर त्यांनी नियंत्रित पद्धतीत बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले होते. विशेष म्हणजे हे ब्लास्ट घडवून आणण्यासाठी पश्चिम घाटात रेकी केली होती. महाराष्ट्र, गुजरातमधील मेट्रोसिटीमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचले असल्याचे समोर आलं आहे.
अशातच आता या दहशतवाद्यांविरोधात तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एनआयएकडून त्यांच्याविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या दहशतवाद्यांनी जेव्हा बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले तेव्हा त्यांनी त्या संबंधीच्या काढलेल्या नोट्स जप्त केल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून ड्रोन, चाकू, कपडे जप्त केले.
Pune Fire News । पुण्यात अग्नितांडव! प्रसिद्ध गॅरेजलला भीषण आग; सगळीकडे आरडाओरडा