Datta Dalvi । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भाषणात शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली होती. मात्र सध्या त्यांची जामीनावर सुटका झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तीन दिवसापूर्वी अटक झाली होती त्यानंतर आज त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. दत्ता गवळी यांची जामीनावर सुटका झाल्यावर त्यांच्या कुटुंबाने त्यांची आरती ओवाळून स्वागत केले. (Latest Marathi News)
त्याचबरोबर आम्ही गद्दारांची अवलाद नाही, शिवसेनेचे रक्त आहे. आमच्या गाड्या फोडताना मी तिथे असतो तर दोघांना लोळवल असतं अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी दत्ता दळवी यांनी दिली आहे. त्याचबरोबर याबाबत बोलताना दत्ता दळवी म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Anand Dighe) यांच्या चित्रपटांमध्ये ही शिवी दिली गेली तरीही मला जाणून-बुजून अटक केली आहे. हा सत्तेचा माज आहे. असे देखील ते म्हणाले आहेत.
Virat Kohli । विराट कोहलीबद्दल धक्कादायक बातमी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
सध्या माझे वय 71 आहे मात्र आमच्यामध्ये शिवसेनेचे रक्त आहे. माझी गाडी फोडली त्यावेळी जर मी असतो तर दोघांना तरी लोळवल असत. मी जेलमध्ये असताना ते कुणाला भेटले? कुठे बसले होते मला माहित नाही. गुंडागिरी करून काय होणार. समोरच्यांची ही भ्याड वृत्ती आहे. असही ते म्हणाले आहेत.