Datta Dalvi । अटकेनंतर दत्ता दळवी यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कितीही गुन्हे दाखल झाले तरी…”

Datta Dalvi

Datta Dalvi । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विधानसभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते (उद्धव ठाकरे) दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना आज (भांडुप पोलिसांनी) अटक केली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी भांडुप पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली.

Anju Return From Pakistan । मुलांच्या आठवणी सतावतात…मानसिकदृष्ट्या अस्वस्थ, पाकिस्तानात गेलेली अंजू 6 महिन्यांनंतर भारतात परतली

पोलिसांनी दत्ता दळवी यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दत्ता दळवीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटकेनंतर दत्ता दळवी यांनी एबीपी माझावर प्रतिक्रिया दिली आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे दत्ता दळवी यांनी सांगितले.

Maharashtra Winter Session। 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार सुरू, या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता

काय म्हणाले दत्ता दळवी?

आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी सांगितले. जे शब्द आनंद दिघे यांनी धर्मवीर चित्रपटात वापरले होते तेच शब्द मी वापरले होते. मालवणी भाषेत यापेक्षाही वाईट अपमान आहेत, पण मी दिलेले नाहीत, असेही दत्ता दळवी म्हणाले. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. हे सूडाचे राजकारण असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Weather News । सावधान! पुढील काही तास महत्त्वाचे! देशातील काही राज्यांवर चक्रीवादळाचा धोका निर्माण

Spread the love