Dattatray Bharne । सोशल मीडियावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होते आहे. मतदारांना दमदाटी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. सगळीकडे या व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांनी याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना भरणे म्हणाले, “‘मी शिवी दिलीच नाही, ग्रामीण भाषेत बोललो, तो कार्यकर्ता पैसे वाटत होता. कार्यकर्त्यांमध्ये भांडण सुरू होतं. असं भरणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान भरणे यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्यांचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता बारामतीच राजकारण चांगलंच तापल्याच पाहायला मिळत आहे.
पाहा भरणे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024