Dattatray Bharne । बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरु आहे. बारामती मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होते आहे. मतदारांना दमदाटी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Palghar Politics News । शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का! बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
रोहित पवार यांनी भरणे यांचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!” असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
Ajit Pawar । रात्री पैसे वाटले, रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवारांनी दिल सडेतोड उत्तर; म्हणाले…
पाहा ट्विट
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024