Daund News । मोठी बातमी! दौंडमध्ये नवे राजकीय समीकरणं; राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात संघर्षाची शक्यता

Daund News

Daund News । महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण तयार होत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या विरोधात मोठा नेते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अजित पवार गटातील माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, ज्यामुळे ते शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

अंबानींची मोठी खेळी: JioCinema आणि Disney+ Hotstar एकत्र, OTT विश्वात धमाका

रमेश थोरात यांनी त्यांच्या लढाईची तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले, “आतापर्यंत तुतारीचा निरोप आलेला नाही. जर तुतारी आली, तर मतदारांशी चर्चा करून पुढला निर्णय घेणार आहे. अपक्ष लढण्याची तयारी आहे.” थोरातांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी बैठक केली असून, त्यांनी आपल्या लढाईची तयारी स्पष्ट केली आहे.

Eknath Shinde । ब्रेकिंग! एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार; महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता?

यंदाच्या निवडणुकीत राहुल कुल आणि रमेश थोरात यांच्यात संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. त्यांची लढाई स्थानिक जनतेच्या भावनांना आकार देऊ शकते. दौंडमधील राजकारणात हे दोन नेते एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यास त्याचा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे या राजकीय चुरशीकडे लक्ष ठेवणे महत्वाचे ठरेल.

Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरू

Spread the love