Daund News । राज्यात मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, दौंड तालुक्यातील मळद येथील भैरवनाथ विद्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बापूसाहेब धुमाळ नावाच्या शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धुमाळ, जो इंग्रजी विषयाचे अध्यापन करतो, त्याने व्हाट्सअप व्हिडिओ कॉल आणि अन्य साधनांचा वापर करून विद्यार्थिनीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले.
या घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळा प्रशासन व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. पोलिसांनी शिक्षकाचा मोबाईल ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मळद गावात संतापाची लाट उसळली असून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
Breaking News । ब्रेकिंग न्युज! बदलापूर अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक
संस्थाचालक बबन रणवरे आणि मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आरोपीने आणखी काही विद्यार्थिनींवर अत्याचार केले असल्याची शक्यता असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
Thane Hit and Run Case । ठाण्यातील हिट अँड रनचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अनेकांना कारने चिरडले