मुंबई : रविवारी सकाळी सातच्या सुमारास इडीच पथक संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी पोहोचल. त्यांच्या घरातील कागदपत्र व दस्तावेज अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले व साडेअकरा लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्यांच्या घरी सापडलेल्या साडेअकरा लाखांचा हिशोब न देता येणे आणि चौकशीला सहकार्य न करणे या दोन आरोपांखाली त्यांना 1 ऑगस्ट 2022 रोजी पावणे एक वाजता संजय राऊतांना अधिकृतपणे ED कडून अटक करण्यात आली. यावर अनेक राजकीय व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या. आता यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
“सूडबुद्धीने कोणत्याही यंत्रणेने कारवाई करू नये, कारण दिवस बदलत असतात. मागच्या काही दिवसापासून अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीसा आल्या आहेत. माझे एवढेच म्हणणे आहे की, यंत्रणांनी सूडभावने कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये”. अशी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊतांना ईडीकडून अटक
संजय राऊत यांची चौकशी साडेचार तासाहून अधिक चालली. त्यांच्या घरी सापडलेल्या साडेअकरा लाखांचा हिशोब न देता येणे आणि चौकशीला सहकार्य न करणे या दोन आरोपांखाली त्यांना 1 ऑगस्ट 2022 रोजी पावणे एक वाजता संजय राऊतांना अधिकृतपणे ED कडून अटक करण्यात आली. उद्या मेडिकल तपासणी होऊन संजय राऊतांना कोर्टात हजर करण्यात येईल.