मध्यप्रदेशमध्ये एक ६ वर्षाचा मुलगा बोअरमध्ये अडकला होता. खेळता खेळता मुलगा ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. दरम्यान, 84 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ६ वर्षीय तन्मयला ४०० फूट खोल खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला असून त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.
Nilesh Lanke: आमदार निलेश लंकेची तब्बेत खालावली
मागच्या तीन दिवसांपासून तन्मयला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते पण या प्रयत्नांना अपयश आले. अखेर त्याची प्राणज्योत मालवली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील तन्मयच्या मृत्यूनंतर दुःख व्यक्त केलं आहे. तसंच तन्मयच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी म्हंटल आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आज श्रीगोंदा दौऱ्यावर; ‘असा’ असेल दौरा
नेमकी कशी घडली होती घटना?
६ वर्षीय तन्मयचे आईवडील काम करत होते आणि तो तिथे त्यांच्या भोवती खेळत होता. पण जास्त वेळ होऊन गेला तरी तन्मय दिसत नसल्याने आईवडिलांनी धाव घेतली. व आजूबाजूला पाहिले असता बोअरवेलमधून तन्मयच्या रडण्याचा आवाज येत होता. नंतर तन्मय बोरवेलमध्ये अडकल्याचे समजताच त्यांनी गावकऱ्यांना बोलावले.
“…अन् त्या लहान मुलाचा जागीच मृत्यु झाला”; वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे घडला धक्कादायक प्रकार