
नांदेड (Nanded) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील ऊसतोड कामगाराच्या (Worker) मुलाचा अंगावर गरम पाणी पडून मृत्यु झाला. कडक्याच्या थंडीत गरम ऊब घेण्यासाठी हा मुलगा चुलीसमोर बसला होता. यावेळी ही घटना घडली आहे.
अखेर राखीच्या नवऱ्याने सोडले मौन; म्हणाला “मला सुशांतसिंह राजपूत…”
त्याच झालं असं की, ऊसतोड कामगाराचा मुलगा चुलीसमोर ऊब घ्यायला बसला होता. दरम्यान त्याचा धक्का चुलीला लागला आणि चुलीवर असणारे गरम उकळते पाणी त्याच्या अंगावर पडले. हे उकळते पाणी त्याच्या अंगावर व पोटावर पडल्याने त्याला मोठ्या प्रमाणात भाजले.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा; उमेदवारांचे चित्र होणार स्पष्ट
जखमी मुलाला त्याच्या कुटुंबियांनी व फडावरील लोकांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यानच कार्तिकचा मृत्यु झाला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अगदी अल्पवयातच चिमुकल्याचा मृत्यु झाल्याने मुलाच्या आईला मोठा धक्का बसला आहे.
शरद पवारांनी ‘ते’ विधान करताच सभागृहात पिकला हशा! थेट इंदुरीकर महाराजांनाच केले टार्गेट
या घटनेमुळे पुन्हा एकदा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या सुरक्षिततेचा (Safty) प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन थंडीत ही मुलं आई वडिलांसोबत फडावर असतात. यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच या मुलांच्या शिक्षणाकडे देखील दुर्लक्ष होते.