अभिनेता सिद्धांत वीर याचा नुकताच जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यावरून जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू ओढावण्याचे प्रमाण वाढत आहे. हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर अभिनेते सुनील शेट्टी यांनीदेखील आपली प्रतिक्रिया एका मुलाखती दरम्यान दिली आहे.
धक्कादायक! समुद्रात वाहून गेली पाच मुले
सुनील शेट्टी ( Sunil Shetti) हा स्वतः त्याच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो. बॉलिवूड मधील तंदरुस्त अभिनेत्यांपैकी तो एक आहे. सध्या एम एक्स प्लेअरवरील धारावी बॅंक या त्याच्या वेब सीरिजच्या निमित्ताने सुनील शेट्टी याने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.
चंपक चाचांचा अपघात; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चे चित्रीकरण थांबले
या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टी याला जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू ओढावण्याच्या वाढत असलेल्या प्रमाणाबद्दल बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना सुनील शेट्टी याने, व्यायाम केल्याने मृत्यू होऊ शकत नाही. असे महत्त्वाचे विधान केले.
कुठलाच क्लास न लावताच झाली आयएएस अधिकारी; वाचा कृषीकन्येची यशोगाथा
मात्र, सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन पावडर शरीरासाठी हानिकारक असून स्टेरॉइड व सप्लिमेंट ( Stetoids & Suppliments) घेतल्यामुळे हृदयविकाराच्या झटका येऊन मृत्यू होऊ शकतो. असे सुनील शेट्टी याने संगीतले आहे. याआधी राजू श्रीवास्तव, सागर पांडे, पुनीत कुमार यांचा सुद्धा याच कारणाने मृत्यू झाला आहे.
सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले तर महाराष्ट्रातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही – राहुल गांधी