मुंबई : सध्या बॉलिवूडमधील सिद्धार्थ आणि कियारा (Siddharth-Kiara) हे जोडपं सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नुकत्याच या दोघांनी ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. आता या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होऊ लागली. सिद्धार्थने एका मुलाखतीमध्ये सांगितले की ‘आता आमच्या दोघांमध्ये लपवून ठेवण्यासारखं काहीही नाही’. त्यांच्या लग्नाची तारीख देखील समोर आल्याची चर्चा आहे.
सोशल मीडियावर तरुणीसोबत झालेली ओळख एका तरुणाला पडली महागात
सूत्रांच्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियारा हे जोडपं ६ एप्रिल २०२३ रोजी विवाह करणार आहे. या दोघांनाही लग्न करण्याची खूप घाई झाली आहे. दिल्लीमध्ये त्यांचा विवाह पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोठी बातमी! पुन्हा एसटी संप होणार? ‘या’ कारणामुळे संतापले कर्मचारी
यांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी देखील सुरु केली आहे. दोघे पहिले कोर्टात लग्न करणार आहेत त्यानंतर नातेवाईक, पाहुण्यांसाठी स्वागत समारंभ ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, ‘शेरशाह’ या चित्रपटात दोघांनीही एकत्र काम केलं. तेव्हापासून ही दोघे एकमेकांना डेट करू लागले आहेत.
जेवण सुरू करण्याआधी ताटाभोवती पाणी का शिंपडले जाते? वाचा सविस्तर