संरक्षणमंत्री कोरोना पॉझिटिव्ह; कोरोना रुग्णांची संख्या वाढली

Defense Minister Corona Positive; The number of corona patients increased

देशात हळूहळू पुन्हा एकदा कोरोना आपले डोके वर काढत आहे. कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात चक्क २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह ( Covid Positive) आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राजनाथ सिंह ( Rajnath Sinh) यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे.

धक्कादायक! प्रसिद्ध गायक हनी सिंग वर मारहाण व किडनॅपिंगचा आरोप

महत्त्वाची बाब म्हणजे राजनाथ सिंह यांनी बुधवारी (ता.१९) दिल्लीमध्ये एका कमांडर कॉन्फरन्समध्ये भाग घेतला होता. माणेकशॉ सेंटरमध्ये ही कॉन्फरन्स झाली होती. याशिवाय राजनाथ सिंह आज (ता.२०) नवी दिल्लीमध्ये भारतीय वायुसेना कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते. परंतु, कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ते या परिषदेत सहभागी होणार नाहीत.

आराध्यासाठी बच्चन कुटूंबाने घेतली उच्च कोर्टात धाव; खोट्या बातमीमुळे उचलले ठोस पाऊल

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. देशामध्ये फक्त एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची १२५९१ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे कोरोना संक्रमित लोकांची संख्या आता ४.४८ कोटी झाली आहे. तसेच देशात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६५,२८६ वर पोहोचली आहे.

“…तर मला गुंड होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”; सलमानचे वक्तव्य चर्चेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *