Delhi Accident । अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात एका वेगवान कारने सिलिंडरने भरलेल्या रिक्षाला धडक दिली. त्यामुळे सहा वर्षांची मुलगी आणि रिक्षाचालक जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी रिक्षाचालक आणि मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताचे एक व्हिडिओ फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये कार वेगात वळण घेते आणि नंतर दुभाजक टाळून सिलिंडर घेऊन जाणाऱ्या रिक्षाला धडकली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचालक रिक्षामधून उडून दूरवर पडला. यानंतर कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या कारला धडकते. या अपघातात रिक्षाचालकासह अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Delhi Accident News)
याबाबत अधिकची माहिती अशी की, शालीमार बागेत रिक्षाला धडक देण्यापूर्वी या कारचालकाने ६ वर्षीय मुलगी आणि तिच्या आईला धडक दिली होती. या दोघांना धडक दिल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याने सिलेंडरने भरलेल्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात आई आणि मुलगी जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH दिल्ली: शालीमार बाग इलाके में एक तेज रफ्तार कार ने गाड़ी चालक को टक्कर मार दी, घायल को अस्पताल ले जाया गया।
— ANI_HindiNews (@AHindinews) December 18, 2023
(CCTV वीडियो सोर्स: दिल्ली पुलिस) pic.twitter.com/ozYJD3lB0p