Delhi Crime | सध्या दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी पोलिसांच्या पथकाला दिल्लीतील बदरपूर भागात तीन मुल मृतदेह ओढताना दिसले, त्यानंतर तिघेही बदमाश पळू लागले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघालेल्या या तीन मुलांना पोलिसांनी पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकारामुळे तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.
Rohit Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ‘हा’ बडा नेता दाखल करणार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांना पाहून चोरटे कसे पळून जातात हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. माहितीनुसार, ही घटना काल रात्री उशिरा दक्षिण पूर्व दिल्लीतील बदरपूर भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेला तरुण हा २२ वर्षीय आहे. त्याचबरोबर त्याचा मृतदेह रस्त्यावर ओढून नेणाऱ्या तीन हल्लेखोरांपैकी दोघे अल्पवयीन आहेत.
हे तीन तरुण मृतदेह बदरपूर परिसरातील कालव्याजवळ ओढत नेत होते. पोलिसांना पाहताच तिघेही पळू लागले. यानंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून आरोपीला अटक केली. चौकशीत तिन्ही आरोपींनी सांगितले की, त्यांचे मृत तरुणासोबत भांडण झाले होते, त्यानंतर त्यांनी त्याचा चाकूने वार करून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी रस्त्यावर आणला जात असताना पोलिसांनी या आरोपींना पकडले.
Shah Rukhkhan । शाहरुख खानने कुटुंबाच्या सर्वात वाईट काळाबद्दल केले मोठे वक्तव्य!