Delhi Crime । सध्या आययटी दिल्लीमध्ये (IIT Delhi) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी फॅशन शो साठी आलेल्या मुलींचा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला आहे. विद्यार्थिनी वॉशरूममध्ये कपडे बदलत असताना त्यांचा व्हिडिओ काढण्यात आला. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यामधील एका मुलीच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघडकीस आला.
Rohit Pawar । “संपूर्ण महाराष्ट्र भिकारी होईल पण…” रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य
आयआयटी दिल्लीतील सफाई कर्मचाऱ्यांने हे घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. शुक्रवारी या कर्मचाऱ्याने हे धक्कादायक कृत्य केले आहे. आयआयटी दिल्लीत फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठी भारती महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांनी आयआयटीत आल्या होत्या. यावेळी मुली कपडे बदलण्यासाठी वॉशरूममध्ये गेल्या यावेळी येथील कामगारांनी त्यांचा लपून व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एका विद्यार्थिनीचे यावर लक्ष गेले आणि तिने आरडाओरडा सुरू केला.
त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील उपस्थित लोकांनी त्याला लगेचच पकडलं. यावेळी लोकांनी त्याचा मोबाईल चेक केला आणि त्या मोबाईल मध्ये मुलींचा व्हिडिओ मिळाला. लगेचच पोलिसांना फोन करून बोलावलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचबरोबर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने या प्रकारचा निषेध नोंदवला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.