
Delhi Metro Video । दिल्ली मेट्रोचा दररोज काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. काहीजण दिल्ली मेट्रोमध्ये डान्स करताना दिसतात. काहीजण दिल्ली मेट्रोमध्ये आपले गायन कौशल्य दाखवतात. तर काहीजण अश्लील कृत्य करताना दिसतात. कारण काहीही असो, दिल्ली मेट्रो चर्चेत राहते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन महिला दिल्ली मेट्रोमध्ये एका सीटसाठी भांडताना दिसत आहेत.
Abhishek Ghosalkar । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!
मेट्रोमध्ये सीटसाठी महिलांमध्ये वाद
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिल्ली मेट्रोचे दृश्य दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काही महिला मेट्रोच्या सीटवर बसलेल्या दिसत आहेत. तेवढ्यात एक महिला येते आणि दुसऱ्या महिलेला उठायला सांगते. पण ती बाई डगमगली नाही आणि वाद घालू लागली.
जबरदस्तीने उभी असलेली महिला मध्यभागी बसण्याचा प्रयत्न करते आणि बसते. दरम्यान, दोघींमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर ती महिला म्हणते मी आत्ता CRPF ला फोन करते. तर दुसरी बाई म्हणते हो फोन कर. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Delhi Metro me aapka swaagat hai 😂😭#DelhiMetro pic.twitter.com/JgMqcECqLP
— Diksha❤ (@Aapki_diksha__) February 8, 2024