Delhi News । दिल्लीतील प्रेम नगर भागात एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. आगीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराला आगीची घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
Murlidhar Mohol । पुण्यातील भाजप खासदाराने लोकसभेत मराठीत घेतली शपथ; पाहा व्हिडीओ
दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घरातील आग विझवण्यात आली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू धुरामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अपघाताचा तपास करत आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किट
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आगीच्या ज्वाळांसह घरामध्ये धुराचे लोट पसरले होते. इन्व्हर्टरमधील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ज्या ठिकाणी इन्व्हर्टर बसवले होते त्याच ठिकाणी सोफाही ठेवण्यात आला होता. इन्व्हर्टरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने ठिणगी पडल्याने सोफ्याला आग लागली. सोफ्याच्या कव्हरमधून निघणारा धूर घरात पसरला.