Site icon e लोकहित | Marathi News

सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिली धक्कदायक माहिती

Delhi Police gave shocking information regarding the death of Satish Kaushik

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या प्रकरणावर दिल्ली पोलिसांनी चौकशी केली असता पोलिसांनी पुन्हा एक मोठी अपडेट दिली आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी काही महत्वाचे पुरावे देखील पोलिसांना सापडले आहेत.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स पाहून लोकंही हैराण, घटना कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO

गुरुवारी सतीश कौशिक यांचा मृत्यू झाला. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला स्प्ष्ट झाले होते. मात्र यावर दिल्ली पोलिसांनी तपास केला असता सतीश ज्या फार्महाऊसवर होते तिथे काही औषधं दिल्ली पोलिसांना आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

‘हाय झुमका वाली पोरं’ गाण्यावर गौतमीने पुन्हा गाजवलं मार्केट; पाहा VIDEO

त्यामुळे आता दिल्ली पोलीस पुढील तपास करत असून आता या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. दरम्यान, सतीश कौशिक यांच्या निधनाने अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. सतीश कौशिक हे प्रसिद्ध अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते.

“खतं खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारल्यावर संतापले अजित पवार; म्हणाले…

Spread the love
Exit mobile version