दिल्लीमधील नवीन संसद ( New Parliment) भवनाचा उद्घाटन सोहळा आज थाटात पार पडला. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र दिल्लीतच दुसरी एक अशी गोष्ट घडली आहे, ज्याबद्दल सगळीकडे खंत व्यक्त केली जात आहे. यावेळी जंतरमंतर (Jantarmantar) सुरू असलेल्या महिला कुस्तीपट्टूंना अतिशय चुकीच्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
यंदाच्या वर्षी २५ हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरसाठी अनुदान; अर्जही झाले दाखल
या पार्श्वभूमीवर दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहिले आहे. WFI चे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्यात यावी व महिला कुस्तीपट्टूंची सुटका करावी, अशी मागणी स्वाती मालीवाल यांना करण्यात आली आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी महिला कुस्तीपट्टूंना अटक केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशीही मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत शरद पवार म्हणाले, “मी गेलो नाही याचा मला आनंद आहे…”
यावेळी स्वाती मालीवाल म्हणाल्या की, ” जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्ली पोलिसांनी मारहाण केली. हे पाहून दिल्ली महिला आयोगाला फार दुःख झाले आहे. या पोलिसांनी ज्या पद्धतीने कुस्तीपट्टूंना रस्त्यावर ओढले हे अत्यंत अशोभनीय आहे. या महिला देशाच्या चॅम्पियन आहेत. त्यांनी त्यांच्या खेळातून देशाचे नाव कमावले आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांना तातडीने अटक करण्यात यावी व या चॅम्पियन्सवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक करावी. “
बैलगाडा शर्यतीसाठी सरकारची नियमावली जाहीर; वाचा सविस्तर नियमावली