दिल्ली : केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक वेगवेगळ्या योजना राबवत असते. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदाही शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक यंत्रांची गरज भासते. आता याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देतंय. हे अनुदान पीएम किसान ट्रॅकटर योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
धुक्यांमुळे पिकांवर होतो ‘हा’ परिणाम, करा हे उपाय
नेमकी काय आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजना –
पूर्वीच्या काळी शेती करताना बैलांचा वापर केला जात होता. पण आताच्या काळात शेतीसाठी ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात गरज भासते. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे बरेच शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाहीत. त्यासाठी मग शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी ट्रॅक्टर भाड्याने आणावा लागतो. याचा विचार करून करून शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या निम्म्या किमतीमध्ये ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जातील. या योजनेअंतर्गत शेतकरी कोणत्यापण जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
– शेतकऱ्याचे आधार कार्ड
– जमिनीचे कागदपत्रे
– बँक तपशील
– पासपोर्ट साईज फोटो