Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर

Delightful for farmers! Onion got Rs 3500 in this market committee

सध्या कांद्याच्या दरामध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याने आता शेतकऱ्यांच्या (Farmers) चेहऱ्यावर समाधान आणि हसू आणेल अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे कांद्याला (Onion) चांगला दर मिळत असल्याने कांदा उत्पादक (Onion grower) शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तसेच सध्या जर कांदा आवकेचा (Onion Intake) विचार केला तर सध्या कांद्याची आवक एकदम नगण्य आहे. दरम्यान त्यामागे बरीच कारणे आहेत. याच महत्वाचं कारण म्हणजे सध्या नवीन कांदा अजून देखील बाजारपेठेत आला नाही.

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, सरकारने 50 हजाराच्या प्रोत्साहन अनुदानाच्या ‘या’ जाचक अटी केल्या रद्द

परंतु सध्या जो कांदा बाजारात आलाय तो जुना कांदा आहे. हा कांदा शेतकऱ्यांनी चाळींमध्ये साठवून ठेवलेला होता. परंतु दुर्दैवाने तोदेखील आता चाळींमध्ये बराच खराब होत असल्याने याचा परिणाम कांदा आवकेवर दिसून येत आहे. त्यामुळे या कांदा दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना कितपत मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात कांदा शिल्लक आहे. अशा शेतकऱ्यांना तरी कांदा दरवाढीचे समाधान लाभेल अशी स्थिती सध्या आहे.

ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल 29 वर्षीय विद्यार्थ्याला अटक

तसेच याच पार्श्वभूमीवर काल झालेल्या पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तिसगाव उपबाजार आवारातीत कांदा लिलाव (Onion auction)झाला. हा लिलाव आवारामध्ये आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच मंगळवार, शुक्रवार आणि रविवार असा झाला. दरम्यान या कांदा लिलावाचा विचार केला तर या ठिकाणी कांद्याला उच्चांक असा साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये थोडासा दिलासा मिळताना दिसून येत आहे. महत्वाची बाब म्हणजे जर आपण कालच्या तिसगाव उपबाजार आवारातील कांद्याच्या दराची स्थिती पाहिली तर कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये असा दर कांद्याला मिळाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

सोशल मीडियावर भावना व्यक्त करताय? तर सावधान, नाहीतर होईल ‘ही’ कारवाई

इतकंच नाही तर आज राज्यातील अमरावती बाजार समितीमध्ये 340 क्विंटल कांद्याचे आवक झाली आहे. दरम्यान यावेळी झालेल्या कांद्याच्या लिलावामध्ये किमान 1600 रुपये प्रति क्विंटल तर कमाल 3600 रुपये प्रतिक्विंटल एवढा उच्चांकी दर मिळाला. महत्वाची बाब म्हणजे अमरावती बाजार समितीतील कांद्याच्या दरातील सरासरी पाहिली तर ती 2600 रुपये इतकी होती. त्यामुळे आता कांद्याचे बाजार भावमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. परंतु भविष्यकाळात स्थिती काय राहील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु याबद्दल आज तरी सांगणे कठीण आहे.

मोठी बातमी! दूध संघांची पुण्यात बैठक, दुधाचे दर वाढण्याची शक्यता

Spread the love
Exit mobile version