शेतीच्या व शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कायम प्रयत्नशील असते. यासाठी अनेक योजना देखील राबविण्यात येतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.
आईला काम करताना ऊन लागू नये म्हणून चिमुरडीने केलेले कृत्य पाहून नेटकरी भावुक; पाहा VIDEO
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपये मिळतात. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये या हप्त्याच्या रकमेत बदल करून रक्कम वाढवू शकते. ही रक्कम सहा हजारावरून आठ हजार रुपये होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पीएम किसान योजनेच्या ( PM Kisan Yojana) 13 व्या हप्त्यासाठी सरकारने काही नियम कडक केले होते. या योजनेत खोटी कागदपत्रे दाखवून लाभ घेतल्याचे व फसवणूक केल्याचे समोर येताच सरकारने ई-केवायसी व जमिनीच्या नोंदी करून घेणे अनिवार्य केले होते. याशिवाय रेशनकार्ड लिंक करण्याबाबत देखील सूचना देण्यात आल्या होत्या.
मोठी बातमी! राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचे होणार; विद्यापीठांना नियमावली काढण्याचे आदेश
या नियमांचे पालन ज्या शेतकऱ्यांनी केले आहे त्यांना पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता लवकरच प्राप्त होणार आहे. हे नियम पूर्ण करण्यासाठी शेतकरी ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी शेतकरी त्यांच्या जवळील कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल