Site icon e लोकहित | Marathi News

गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण देण्याची मागणी; राज्यात ठीकठिकाणी निदर्शने!

Demand for police protection to Gautami Patil; Demonstrations in the state!

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. लावणी कलाकार गौतमी पाटीलच्या ( Gautami Patil) कार्यक्रमात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी आणि तिची नाचण्याची पद्धत यावरून ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. दरम्यान राज्यातील अनेक संघटना व पक्षांनी तिच्या कार्यक्रमांवर बंदी घाला अशी मागणी केली आहे.

फडणवीस एवढे का बदलले आहेत? संजय राऊतांनी उपस्थित केला प्रश्न

दरम्यान गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी देखील काही ठिकाणांहून केली जात आहे. यामध्ये दलित महासंटनेचा समावेश आहे. गौतमी पाटीलला पोलीस संरक्षण द्या अन्यथा दलित महासंघाच्या युवकांसोबत तिच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बंदोबस्त करू, असे यावेळी सांगण्यात आले आहे. या मागणीसाठी त्यांनी जोरदार निदर्शने देखील केली आहेत.

अजित पवार कडाडले! म्हणाले; “त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायला…”

आतापर्यंत गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची चर्चा होती परंतु, आता तिला पोलीस संरक्षण ( Police Protection) देण्याची मागणी होत आहे. यावरून राज्यात चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय गौतमी पाटीलने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत “मी लावणी करत नाही तर डीजे डान्स करते व गाणी लागेल तशी नाचते”,असे वक्तव्य केले आहे.

अर्रर्रर्र! वासोट्याला जायचा प्लॅन कॅन्सल करावा लागणार; पुढील तीन दिवस किल्ल्यावर पर्यटकांना बंदी

Spread the love
Exit mobile version