आजही आपल्या देशात बलात्कार, अत्याचार व छेडछाडीच्या घटना घडतात. यामुळे महिलांना सुरक्षित वाटत नाही. बऱ्याचदा स्वतःच्याच घरात महिला सुरक्षित नसतात. दरम्यान शाळा, महाविद्यालये, कामाची ठिकाणे व इतर सार्वजनिक स्थळी महिलांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशात काही कायदे व नियम देखील बनवण्यात आले आहे. परंतु, बऱ्याचदा या नियमांचे सुद्धा व्यवस्थित पालन केले जात नाही.
टीसी कॉलेजमधील मीडिया डिपार्टमेंटकडून महिला सशक्तीकरणावर कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा पुढाकार
दरम्यान 16 डिसेंबरला झालेल्या निर्भया दिनानिमित्त ( Nirbhaya Day) राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (NCIB) केलेले ट्विट चांगलेच चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी रस्त्यात महिलांची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना इशारा दिला आहे. यामध्ये सांगितल्या प्रमाणे, ‘जर कोणतीही व्यक्ती एखाद्या महिलेला अथवा मुलीला आवारा, छम्मक-छल्लो, आयटम, चुडैल, कलमुखी, चरित्रहीन यांसारख्या अश्लील शब्दांचा वापर करून बोलत असेल किंवा अश्लील इशारे करत असेल. ज्यामुळे त्या महिलेला आपमानित झाल्यासारखे वाटेल तर त्या व्यक्तीला आयपीसी 509 अंतर्गत तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा आर्थिक दंड होऊ शकतो.’
हिवाळ्यात साताऱ्यात ट्रिप प्लॅन करताय, तर ‘ही’ ठिकाणे विसरू नकाच!
या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी रिट्विट देखील केले आहे. या प्रतिक्रियांमध्ये युजर्स कडून अजून एक मागणी करण्यात आली आहे. अनेकदा महिला सुद्धा पुरुषांना अश्लील शब्दात किंवा अपमानकारक शब्दात बोलतात. यावेळी काय करायचं ? बऱ्याचदा महिला पुरुषांना कुत्ता, नीच, लतखोर, बेवडा, नशेडी, छपरी या शब्दांचा वापर करुन बोलतात. त्यामुळे पुरुषांचा अपमान करणाऱ्या महिलांना देखील शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी काही युजर्सकडून करण्यात आली आहे.
भेटायला नकार दिला म्हणून तरुणीचे अश्लील फोटो केले व्हायरल; इंस्टाग्राम ओळख पडली महागात