सोमेश्वर कॉलेजला दिलेले शरद पवारांचे नाव काढून टाकण्याची मागणी; शेतकरी कृती समितीने घेतला आक्षेप

Demand to remove Sharad Pawar's name given to Someshwar College; The Farmers Action Committee objected

बारामती: पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजला नुकतेच शरद पवारांचे नाव दिले आहे. यापार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी शरद पवार यांचे कॉलेजला दिलेले नाव काढावे अशी मागणी केली आहे.

पोरांना नादी लावणाऱ्या गौतमीने आठवीतून शिक्षण सोडून सांभाळली कुटुंबाची जबाबदारी; वाचा सविस्तर

सोमेश्वर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेज चालवले जाते. या कॉलेजला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिल्याने शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश दराडे यांनी आक्षेप घेतला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! ‘या’ खतांवर मिळणार अनुदान; वाचा सविस्तर

‘कॉलेजला शरद पवारांचे नाव देताना संचालक मंडळाने कारखान्याच्या सभासदांना विश्वासात घेतले नाही’, असा आरोप सतीश दराडे यांनी केला आहे. संचालक मंडळाने कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडायला हवा होता व सभासदांशी चर्चा करून नामांतराचा निर्णय घ्यायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी! कांद्याला मिळाला ‘इतका’ दर; वाचा सविस्तर

तसेच पवार कुटुंबियांचा करखान्याशी काहीच संबंध नसताना त्यांचे नाव कॉलेजला देण्याचे कारण काय ? असा प्रश्न देखील सतीश दराडे यांनी उपस्थित केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी “संचालक मंडळाने नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दराडे यांनी आक्षेप घेण्याचे काही कारण नाही”, असे म्हंटले आहे. शरद पवार यांनी पवार ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण संस्थेला तीन कोटी रुपये दिल्याने त्यांचं नाव देण्यात आले आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.

धक्कयादक! बारामतीमधील भिगवण रोडवर पत्रकारावर गोळीबार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *