
मुंबई : पुर आणि नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली राज्य सरकारवर टीका. महिना उलटून गेला तरीही यांना मुहूर्त मिळेना, ग्रीन सिग्नल मिळेना, निर्णय बद्दल काहीच माहीती नाही. राज्यातील जनता सरकारच्या भरोवश्यावर आशेने पाहत आहे. मंत्र्यांच्या रिमार्कशिवाय काहीही होऊ शकत नाही.
दुष्काळ पडला तरीही राज्यपालांनी साधी भेटही घेतली नाही. अशी माहिती पूरग्रस्त भागाचा दौरा संपल्यानंतर मदतीसंदर्भात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे. शेतकरी मदतीपासून वंचित आहे, आता जनतेनेच पाहावे, राज्याचा कारभार कसा सुरू आहे ते, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे , असे अजित पवार बारामतीत बोलत होते.. अश्या परस्थितीत अजित पवारांनी पूरग्रस्त भाग आणि नुकसान याविषयी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची नुकतीच भेट घेतली होती. त्याविषयी त्यांनी माहिती दिली ते म्हणाले, की राज्यात सध्या कुठेही दुष्काळ नाही. अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर लक्ष्यात आले की, शेतातील पिके पुर्णपणे उध्वस्त झाली आहेत. पाहणी झाल्या नंतर पवारांनी राज्यपालांची भेट घेतली. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला आहे. काही जण तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलायला लागले आहेत. हे राज्यासाठी चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांची तातडीने मदत करणे गरजेचे आहे. मनुष्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. पाळीव प्राण्याची हानी झाली आहे, घरांची पडझड झाली आहे, गावातील रस्ते, पुल या सगळ्याचीच दुरवस्था झाली आहे. पुलांची पडझड झाली असल्यामुळे संपर्काचे माध्यमचं बंद झाले आहे, असे अजित पवार म्हणाले.