मुंबई : मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) थैमान घातल आहे. आत्ता कुठेतरी हे वातावरण शांत झालेलं होत. पण पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. चीन, अमेरिका, ब्राझील आणि जपानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. माहितीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 131 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
साईबाबांच्या दर्शनाला जाताना आता मास्क वापरणे सक्तीचे: साई संस्थानचं आवाहन
कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता राज्यामध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. ही टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना स्थितीबद्दल सरकारला सतत अपडेट देत राहील. नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
डिसेंबर नंतर सुद्धा गरिबांना मोफत रेशन मिळणार का? केंद्रीय मंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट
दरम्यान, चीनमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासमोर (Health Administration) देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले असून सरकारकडून पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.