Devendra Fadnavis : नागपूरच्या विकासासाठी नवीन प्रकल्पांना गती देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आश्वासन, म्हणाले…

Deputy Chief Minister Devendra Fadnavis promised to speed up new projects for the development of Nagpur, said...

नागपूर : नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आलेले आहे. यावेळी फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. ते म्हणाले आहेत की, हर घर तिरंगा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू करायला सांगितला. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नागपूर मधील सर्वांनी उचलून धरलेला आहे. राष्ट्रभक्तीची हीच भावना येत्या काळात देखील कायम ठेवणार आहोत.

याचसोबत पुढे बोलताना इथून पुढे जाती धर्माच्या नावावर विभाजन होऊन देणार नाही, अशी प्रत्येकाची भावना आहे. यासाठी सर्वच स्तरातील लोकांच्या विकासासाठी प्रयत्न करायचा आहे. पुढील 25 वर्षांचा भारत घडवण्याचा विचार करायचा आहे. महाराष्ट्रात नविन सरकार आलंय, हे सरकार सर्वांना सोबत घेऊन विकास करणार असल्याचे ते म्हणालेले आहेत.

तसेच स्वातंत्र्य लढ्यात नागपूरचं मोठं योगदान आहे. स्वातंत्र्य सैनीकांप्रती नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. गेल्या काही दिवसांत नागपूरचा झपाट्याने विकास होतोय. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना पक्की घरं देण्याचा आमचा प्रयत्न आहे असे देखील ते म्हणालेले आहेत.

तसेच शेतकऱ्यांवर मोठं संकट आलेलं आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत जाहीर करण्यात आली. अजून पुढे जनावरांचं नुकसान, घरांची पडझड यांची आणखी मदत देणार आहोत. विदर्भ मागास राहिला, त्याच्या विकासासाठी सिंचन प्रकल्प, उद्योग यासाठी काम करायचं आहे. उद्योगांना वीज अनुदान देऊन नवीन उद्योग विदर्भात आणणार, रोजगार निर्मित होईल. गेल्या सरकारने विदर्भातील उद्योगाची वीज सबसीडी काढल्याने रोजगार गेले, ती आम्ही परत देऊ, असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *