चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Devendra Fadnavis reacts after BJP's victory; Said, 'AAP' is limited to Delhi only...;

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी! सुषमा अंधारेंनी दिला ‘या’ सदस्यपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, त्यांच्याकडून बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर त्याच्या आशय घ्यावा. माध्यमांनाही केवळ चुकीचे शब्द वापरू नयेत. अर्थात मी काही माध्यमांना दोष देत नाही. पण मला असं वाटतं जे लोक अशा प्रकारचं कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत. त्यांनी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे, त्यांनी माफी देखील मागितली तरीही हे सगळं करणं अतिशय चुकीचं आहे”. असं फडणवीस म्हणाले आहेत.

“आपण कोणालाच घाबरत नाही पण…”; शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या भोवती अंगरक्षक असून देखील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून हल्ला केलाय. चिंचवड गावामध्ये ते एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता त्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे.

बिग ब्रेकिंग! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *