“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना समाज द्यावी” – सचिन खरात

"Deputy Chief Minister Devendra Fadnavis should give society to Gopichand Padalkar" - Sachin Kharat

मागच्या काही दिवसांपूर्वी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान, अजित पवार यांच्यावर टीका करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांची जीभ घसरली आहे. पडळकरांनी एकदम खालच्या पातळीची भाषा वापरली.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार; राजकीय पक्षांची धाकधूक वाढली!

मागच्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्य रक्षक होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असं म्हणणाऱ्यांची कदाचीत सुंता झाली असती. माध्यमांनी नेमकी खरी परिस्थिती काय आहे हे तपासावं असं गोपीचंद पडळकर यांनी म्हंटल आहे. आता यावर सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांच्यावर टीका करण्याऱ्या पडळकरांना जितेंद्र आव्हाडांचे उत्तर, म्हणाले…

सचिन खरात म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरांना समाज द्यावी. अशी मागणी खरात यांनी केली आहे. त्याचबरोबर गोपीचंद पाडळकरांनी अजित पवारांवर टीका करताना एकदम खालच्या पातळीची असल्याची टीका देखील सचिन खरात यांनी केली. त्यांनी यासंबंधी एक व्हिडीओ करत टीका केली आहे.

अजित पवार यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली; म्हणाले…

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजपसह शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी जोरदार टीका केली होती. मात्र आता हा वाद थांबला होता. परंतु यामध्येच आता गोपीचंद पडळकरांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना एकदम खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. त्यामुळे पुन्हा हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गौतम अदानी दोन वेळा मरता मरता वाचले; ‘हे’ थरारक किस्से एकदा वाचाच!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *