Agriculture News । अनेक उपाय करूनही जनावर गाभण राहत नाही? हा घरगुती उपाय येईल कामी

Despite many measures, the animal does not remain pregnant? This home remedy will come in handy

Agriculture News । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा (Animal husbandry) जोडव्यवसाय करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पशुपालनाशिवाय जमिनीची सुपीकता टिकत नाही. रासायनिक खतांमुळे (Chemical fertilizers) जमिनी नापीक होत चालल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्याशिवाय रासायनिक पदार्थ मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप धोकादायक आहेत. (Latest Marathi News)

Asia Cup 2023 । जाहीर झाला आशिया कपचा संघ, कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या

परंतु जनावरांच्या दोन वेतामधील अंतर वाढल्यामुळे पशुपालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. साधारणतः गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर ती ९० ते १२० दिवसांमध्ये पुन्हा गाभण रहायला हवी. जर जनावर वेळेत गाभण न राहिल्याने त्यासाठी खूप खर्च करावा लागतो. अनेकदा खर्च करूनही जनावर गाभण राहत नाही. जनावरांच्या गाभण न राहण्यामागे खूप कारणे असतात. आता तुम्ही त्यावर घरगुती पद्धतीने उपाय करू शकता. (Buffelo and Cow Preganancy)

Maharashtra Rain Update । विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

करा हा उपाय

जनावर गाभण राहण्यासाठी तुम्हाला हळकुंड गरजेचे असेल. या हळकुंडाची दीडशे ग्रॅम बुकटीचा सात दिवसाचा डोस तयार करा. तसेच तुम्हाला गव्हाचे पीठदेखील महत्त्वाचे आहे. तुम्ही हे पीठ तुपात भाजून घेऊन त्यात गुळ किंवा साखर मिक्स करा, या पिठाचा हलवा तयार करून त्यात 20 ग्रॅम हळद पावडर टाका. हा डोस प्रति दिवस 20 ग्रॅम जनावराला द्यावा.

Success Story । इंजिनिअर शेतकऱ्याने पारंपारिक शेती सोडून सुरू केली बागायती शेती, सफरचंद शेतीतून लाखोंची कमाई

जनावर उलटले तर काय करावे?

अनेकवेळा असे होते की एखादे जनावर गाभण राहिले की ते उलटते. जर असे झाले तर त्यावर सदाहरी वनस्पतीचा उपाय करू शकता. स्वच्छ धुवून ही वनस्पती ५०० ग्रॅम जनावरांना खाऊ घाला. तुम्ही ती कुट्टीमध्ये मिसळून खाऊ घालू शकता.

Politics News | “हे फक्त घोषणा करणारं सरकार”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज्य सरकारवर निशाणा

लक्षात ठेवा या गोष्टी

हा डोस जनावरांनी चारा खाऊन झाल्यानंतर सलग सात दिवस द्यावा. विशेषतः हा डोस संध्याकाळी आठ ते नऊच्या सुमारास दिला तर त्याचा जनावरांना जास्त फायदा होतो. या डोसनंतर त्यांना पाणी किंवा चारा देऊ नये. तुम्हाला सात दिवसानंतर फरक दिसून येईल.

Mushroom Price । जिकडे तिकडे याच भाजीची सर्वत्र चर्चा! मटणापेक्षा महाग मिळतेय, 1200 रुपये किलो असूनही लोकांची खरेदीसाठी झुंबड

Spread the love