Ind vs Pak । पराभवानंतरही पाकिस्तानला मोठा धक्का, दोन स्टार खेळाडू संघाबाहेर?

Despite the defeat, a big blow to Pakistan, two star players out of the team?

Ind vs Pak । कोलंबोमध्ये (Colombo) आशिया कपचा (Asia Cup) थरार सुरु आहे. संपूर्ण जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने आले होते. भारताकडून सुपर 4 मध्ये पाकिस्तानला तब्बल 229 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. भारताने पाकिस्तानपुढे 357 धावांचे आव्हान ठेवले होते. (Latest Marathi News)

Ajit Pawar । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अजित पवार गटातील 24 आमदारांवर होणार कारवाई

परंतु भारतीय संघाच्या (Indian teams) गोलंदाजांपुढे पाकिस्तानच्या (Pakistan) फलंदाजांना फार काळ टिकता आले नाही. पाकिस्तानला 32 षटकात केवळ 128 धावा करता आल्या. दारूण पराभवानंतरही पाकिस्तानी संघाला आणखी एक धक्का बसला आहे. या स्पर्धेचे सामने सुरु असताना पाकिस्तानचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे या संघावर मोठे संकट आले आहे.

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटलांना पाठिंबा देणाऱ्या महिला उपोषणकर्त्याची बिघडली तब्येत, पोलीस घटनास्थळी

उरलेल्या सामन्यांत पाकिस्तानचे स्टार गोलंदाज हरिस रौफ आणि नसीम शाह, धडाकेबाज फलंदाज आगा सलमान दुखापतीमुळे खेळू शकणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय पथक या खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहेत. पाकिस्तानने बॅकअप म्हणून शाहनवाज धानी आणि जमान खान यांना श्रीलंकेत बोलावले आहे.

Mrunal Divekar । सोशल मीडिया स्टार मृणाल दिवेकरने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला लग्न केलं होतं आणि…”

Spread the love