Site icon e लोकहित | Marathi News

देवंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला गिरीश बापट यांचा भावनिक व्हिडीओ; पाहा VIDEO

Devandra Fadnavis tweeted Girish Bapat's emotional video; Watch the VIDEO

पुण्यामध्ये कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात गडबड गोंधळ सुरू आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून याठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. कसबा व चिंचवड या दोन्ही ठिकाणी आधी भाजपचे आमदार होते. यामुळे या दोन्ही निवडणूका भाजपसाठी आता प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. दरम्यान कसबा (Kasba) मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु, सध्या कसब्यामध्ये चुरस आहे.

“अजित पवार यांना 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की….”, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य चर्चेत

ही परिस्थिती पाहता भाजपचे आमदार गिरीश बापट ( Girish Bapat) आजारी असूनदेखील मैदानात उतरले आहेत. गिरीश बापट यांनी याआधी अनेक वर्षे कसबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामुळे त्यांचा शब्द कसब्यात अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. यावेळी भाजपने ब्राम्हणेत्तर उमेदवार दिल्याने मतदार वेगळा निर्णय घेण्याची शक्यता होती. यामुळे भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारासाठी खुद्द गिरीश बापट आज मैदानात उतरले आहेत. यादरम्यान आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापटांबद्दल केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

शिंदे व ठाकरे गटाची धडधड वाढली! थोड्याच वेळात सत्तासंघर्षावर निकाल

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत लिहिले की, “असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद, हीच भाजपची ओळख. देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः ! गिरीशभाऊ…कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात. इथल्या मनामनांत तुम्ही भाजपाचे कमळ रुजवले. मतदारराजा तुमचा शब्द राखल्याशिवाय राहणार नाही!”.

अजित पवारांनी भाजपच्या बड्या मंत्र्याला दिला इशारा; म्हणाले, “पुण्यात असले खपवून घेतले…”

Spread the love
Exit mobile version