Devednr Fadanvis And Ajit Pawar Birthday । नागपूर : आज महाराष्ट्र राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे. नेत्यांचा वाढदिवस असल्यावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणे सहाजिकच गोष्ट आहे. सध्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील बॅनरची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहे. (Latest Marathi News )
या बॅनरवर “राजकारणातील ‘दादा’ अजीत दादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा” असा मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे सध्या हे बॅनर सगळीकडे चर्चेचा विषय बनत आहेत. या बॅनरच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. (Devednr Fadanvis And Ajit Pawar Birthday)
Tourist Places । पर्यटकांनो.. फिरायला जात असाल तर थांबा, ‘या’ पर्यटनस्थळांवर आहे बंदी
या बॅनरवर “ही दोस्ती तुटायची नाय” “राजकारणातील ‘दादा’ अजीत दादा, राजकारणातील ‘चाणक्य’ देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा” असा मजूकर लिहिण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे पहाटेच्या शपथविधी सोहळ्याचा एक फोटो देखील ‘या’ बॅनरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनरची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.