Devendr Fadanvis । शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या कायमच चर्चेत असतात. सध्या देखील त्यांनी ‘एक्स’वर (ट्विटर) एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांची एक गाडी दिसत आहे. त्याचबरोबर या गाडीत कैद्यांना काहीतरी पाकीट दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ ट्विटर वर शेअर करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यानंतर आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “”ललित पाटील केसमध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं. ललितला कोणी प्रोटेक्शन दिलं हे समोर आलं आहे. मात्र आता जो जेलचा व्हिडिओ बाहेर आला आहे त्याबाबत सत्यता पडताळून तपासले जाईल आणि मग कारवाई केली जाईल.” असं फडणवीस म्हणाले आहेत.
Sharad Pawar । मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या सुनावणीला शरद पवार स्वत: हजर
नेमकं काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)
कोर्टामधून येरवडा कारागृहात कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीत कैद्यांना पाकीटे वाटण्याचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की, “उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली.. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड” असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली..
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 9, 2023
कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड @Dev_Fadnavis @ShivsenaUBTComm pic.twitter.com/kJpnRhBJSl