Devendr Fadanvis । महायुतीच्या जागा वाटपावर अद्यापही कोणताच अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र जागा वाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सविस्तरपणे भूमिका मांडली आहे.
Prakash Ambedkar । बिग ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावरच प्रकाश आंबेडकरांनी केली सर्वात मोठी घोषणा
आमचं ८० टक्के काम झालं असून २० टक्के काम बाकी आहे. आज उद्या ते देखील होईल. यावेळी फडणवीस यांना उदयनराजे यांची भेट का घेतली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले उदयनराजे यांची भेट आज गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होईल. ते त्यांचं मत गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मांडतील त्यानंतर जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय होईल. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे.
Vijay Shivtare | ब्रेकिंग! विजय शिवतारेंनी केली सर्वात मोठी घोषणा
त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत का? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले ते अजून ठरलेलं नाही. त्यांनी अजून ठरवायचं आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Prasad Pujari । ब्रेकिंग! 20 वर्षांपासून फरार असलेल्या गुंड प्रसादच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या