Devendr Fadanvis । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जेलमध्ये कैद्यांना पाणीपुरी आणि आईस्क्रीम येणार असल्याचे पत्र काढले आहे. यामुळे कैद्यांसाठीही आनंदाची गोष्ट मानली जात आहे. पाणीपुरी आणि आईस्क्रीम सोबतच चाट मसाला, ताज पाणी, चेस बोर्ड, लोणचं, ओट्स, कॉफी पावडर, लोणावळा चिक्की, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ, शुगर स्वीटनर, पनीर बटर, पाणीपुरी, कलरिंग मटेरियल या वस्तूंची यादी करण्यात आली आहे.
माहितीनुसार तुरुंगातील कॅन्टीनच्या यादीत 173 नव्या पदार्थांची भर पडली आहे. त्यामुळे हा निर्णय कैऱ्यांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे. मात्र निवडणुकाजवळ आल्या की गुन्हेगारांना जामीन मिळतो असा आरोप विरोधी पक्ष सातत्याने सत्ताधाऱ्यांवर करत असतात. आता याच पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना खुश करण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांना विविध अन्न पर्यायी उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैद्यांना कारागारगृहातून त्यांच्या कुटुंबीयांशी आणि वकिलाशी आठवड्यातून फोनवर दहा मिनिटे बोलण्याची सवलत देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Politics News । शरद पवार आणि अजित पवार गटासाठी धक्कादायक बातमी, आमदारांचे सदस्यत्व रद्द होणार?