Devendr Fadanvis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एक महत्त्वाचे विधान करताना म्हटले की, शिवसेनेसोबतची (Shivsen) युती नैसर्गिक होती, तर अजित पवारांसोबतची युती ‘नॅचरल’ नव्हती. टीव्ही9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प शाश्वत विकास संमेलन’मध्ये बोलताना फडणवीसांनी स्पष्ट केले की, भाजप (BJP) आणि शिवसेना यांची युती दीर्घकाळाची आणि एका विचारधारेवर आधारित होती. परंतु, अजित पवारांसोबतची युती राजकीय परिस्थितीमुळे केली आहे आणि ती नैसर्गिक मानता येणार नाही.
फडणवीसांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, अजित पवारांसोबतची युती भविष्यात नैसर्गिक होऊ शकते, पण सध्याची स्थिती राजकीय आवश्यकतेमुळे आहे. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील परिणामाचे विश्लेषण करताना सांगितले की, भाजप आणि शिवसेना यांचे मत एकमेकांना मिळाले, पण एनसीपीला असे लाभ झाले नाही. लोकसभा निवडणुकीत एनसीपीने पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यांच्या विजयासाठी भाजपने त्यांना अधिक मतं दिली.
Cabinet Metting । सर्वात मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
फडणवीसांनी युती करण्याच्या निर्णयाला चूक मानण्याचे संकेत दिले नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की, काळाच्या गरजेनुसार निर्णय घेतला गेला आणि संधी आली तर ती सोडणे उचित ठरले नाही. युती स्थिर होण्यासाठी वेळ लागेल, परंतु भविष्यात याचा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीसांनी अजित पवारांवर चिमटा घेताना सांगितले की, अजित पवारांना भाजपचा फायदा होईल, थोडा वेळ द्या.