सलमान खानचा किसीं का भाई किसीं की जान हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची हवी तितकी कमाई झालेली नाही. दरम्यान लॉरेन्स बिश्नोई कडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खान ( Salman Khan) सध्या चर्चेत आहे. काळवीट शिकार प्रकरणानंतर कुख्यात डॉन लॉरेन्स बिश्नोई ( Lorence Bishnoi) कडून सलमानला सतत जिवे मारण्याच्या धमक्या येत आहे. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आता सलमान खानला Y+ सुरक्षा पुरवली आहे.
या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ” सलमान खानला सध्या देण्यात आलेली सुरक्षा सर्वोच्च दर्जाची आहे. त्यामुळे त्याला मुंबई किंवा भारतात कुठेही फिरायला हरकत नाही. मला वाटते सलमान खानसाठी देशात मुंबईपेक्षा कुठलीही जागा सुरक्षित नाही. ” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
त्याच झालं असं होतं की, काही दिवसांपूर्वी सलमान खान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी रजत शर्मांच्या मुलाखतीत सामील झाला होता. यावेळी त्याने लॉरेन्स बिश्नोई कडून येणाऱ्या धमकीवर खुलेपणाने भाष्य केले होते. “मला सतत धमक्या मिळत असल्या तरी यूएईमध्ये सुरक्षित वाटते. मात्र भारतामध्ये थोडी समस्या आहे.” असे म्हणत सलमान खानने भातातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले होते. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.