उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आहेत. मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा दौरा आज पार पडला आहे. सोलापूर मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज महसूल भवनाचे ( Mahsul Bhavan Inauguration) उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेत होते. यावेळी एका ९१ वर्षीय वृद्ध सामाजिक कार्यकर्त्यांना भोवळ आल्याची घटना घडली आहे. (91 years old man get staggers in front of devendra fadanvis)
Big Breaking | ठाकरे गट पुन्हा एकदा फुटणार! शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने केला दावा
विलास शहा (Vilas shah) असे या वृद्ध आजोबांचे नाव आहे. सोलापूर-हैदाराबाद मार्गावरील कत्तलखान्यासंदर्भातील तक्रारीचे निवेदन घेऊन ते याठिकाणी आले होते. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलत असतानाच विलास शहा यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली पडले. यावेळी सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांची एकच धावपळ उडाली.
प्रियांका चोप्राने दिग्दर्शकाबाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाली…
दरम्यान विलास शहा यांना सावरण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस समोर आले होते. देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी विलास शहा यांना पाणी पाजून त्यांना खुर्चीत बसवले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मान्सून संदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट! हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती
विलास शहा हे मागील १५ वर्षांपासून हैदराबाद महामार्गावरील सोनांकुर कत्तलखाना बंद करावेत, या मागणीसाठी लढा देत आहेत. येत्या १५ दिवसांत आपली मागणी मान्य न झाल्यास मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशारा विलास शहा यांनी यावेळी दिला आहे.