Devendra Fadnavis । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, “महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत..”

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील २४ चेकपॉईंट १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. रविवारी, परिवहन भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी परिवहन विभागाला निर्देश दिले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जीएसटी लागू झाल्यानंतर सीमा तपासणी नाक्यांचे महत्त्व कमी झाले आहे, त्यामुळे भविष्यात व्यापारवृद्धी आणि मालवाहतुकीला चालना देण्यासाठी चेकपॉईंट बंद करणे आवश्यक ठरले आहे. १५ एप्रिलपर्यंत या संदर्भात प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

Congress । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ५०० फेसलेस सेवांचे लोकार्पण केले. यामध्ये हलक्या व्यावसायिक वाहनांच्या डीलर पॉईंट नोंदणी आणि हायपोथेकेशन टर्मिनेशनला स्वयंचलित मान्यता देणाऱ्या सेवांचा समावेश आहे. सरकारने ‘मेटा’सोबत करार केला असून, येत्या काळात व्हॉट्सॲपवर आरटीओच्या ४५ फेसलेस सेवांचा समावेश असलेल्या ५०० सेवांची सुरूवात होईल.

Pune Rape Case । पुणे बलात्कार प्रकरणात आरोपी आणि पीडितेमध्ये इतक्या रुपयांचा व्यवहार, धक्कादायक माहिती समोर

या कार्यक्रमात, स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नावाने असंघटित क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महामंडळ सुरू करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. या योजनेंतर्गत १६०० चालकांना १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहन चाचणी आणि चालक प्रशिक्षण केंद्रांची आवश्यकता मांडली आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओच्या प्रबोधनाची महत्त्वाची भूमिका सांगितली.

Dattatraya Gade । सर्वात मोठी बातमी! स्वारगेट प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; पाणी प्यायला गेला आणि अडकला

Spread the love