राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्ष चांगलेच कामाला लागले आहेत. दरम्यान भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढील महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले आहेत की, “निवडणूक आहे म्हणून घोषणा करत नाही. 2012 पासून शिक्षक भरती बंद होती, ती आम्ही सुरू केली आहे.”
छोटा भाईजान म्हणजेच अब्दु रोजिक झळकणार आंतरराष्ट्रीय रिऍलिटी शोमध्ये!
सर्व जिल्ह्यांकडून विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जेवढ्या पूर्ण करता येतील तेवढ्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. मात्र, आचारसंहिता सुरू असल्याने त्याची घोषणा करता येणार नाही. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी दिली आहे .
सोलापूरातील भाविकांचा तिरुपतीहून येताना अपघात! चार जणांचा जागीच मृत्यू
औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यानंतर पत्रकारांशी संवाद साधत फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, आमदार उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यासाठी वाढीव निधी देण्यात येण्याची मागणी उपमुख्यमंत्राकडे केली.