रत्नागिरीमधील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे यांचा सोमवारी (दि.6) अपघात झाला होता. या अपघातात (Accident) ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. रिफायनरी समर्थकांविरोधात बातमी दिल्याने हा अपघात घडवून आणल्याचे सांगितले जात आहे. हा मुद्दा विरोधकांनी देखील चांगलाच उचलून धरला.
कोयता गॅंगनंतर आता तलवार गॅंग घालतेय धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
यांनतर संजय राऊत यांनी या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांना दोन पानी पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणाची खोलवर चौकशी व्हावी आणि 50 त्यांच्या कुटुंबियांना लाखांचे अर्थसहाय्य मिळावं अशी मागणी केली आहे. आता याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.
ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांचा एकाच गाडीतून प्रवास
दरम्यान, शनिवारी दुपारी शशिकांत वारीशे हे मुंबई-गोवा महामार्गावरून जात होते. यावेळी राजापूर येथे पेट्रोल पंपाजवळ एका एसयुव्हीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात शशिकांत वारीशे हे गंभीर जखमी झाले आणि रुग्णालयात दाखल करताच त्यांचा मृत्यू झाला.
सामान्यांना चटका तर शेतकऱ्यांना दिलासा! गोकूळ डेअरीच्या दुधात ‘इतक्या’ रुपयांची वाढ